समाजवादी दिखाऊपणा !

प्रत्येक वेळी हिंदूंच्या देवतांची नावे घेऊन आणि ‘भक्त’पणाचा आव आणून सत्ताकारण करता येत नाही, हे अखिलेश यादव यांनी लक्षात घेऊन श्रीरामाप्रमाणे आदर्श ‘रामराज्य’ आणण्यासाठी अन् श्रीकृष्णाप्रमाणे आदर्श राष्ट्रकारण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे !

सावंतवाडीत प्राणघातक आक्रमण झालेल्या टेम्पोचालकाचे निधन

जिमखाना मैदानानजिक लुटण्याच्या उद्देशाने टेम्पोचालक अजयकुमार श्रीपतराव पाटील (हाडोळी, कोल्हापूर) त्यांच्यावर दोघांनी चाकूने प्राणघातक आक्रमण केले होते. यामध्ये ते गंभीर घायाळ झाल्याने रुग्णालयात उपचार चालू असतांना निधन झाले.

आंध्रप्रदेशच्या सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसच्या महिला नेत्याकडून टोल नाक्यावरील कर्मचार्‍यास मारहाण

येथे सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या नेत्या डी. रेवती यांनी काजा टोल नाक्यावरील टोल नाक्याच्या कर्मचार्‍याच्या थोबाडीत मारली.

पोलिसांवर हात उगारणार्‍या महिला आणि बाल विकासमंत्र्यांनी त्यागपत्र द्यायला हवे होते ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

महिला आणि बाल विकास यशोमती ठाकूर यांनी थेट पोलिसावरच हात उगारला.

चर्चच्या वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेमध्ये बलात्काराचा आरोप असणारे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांचे छायाचित्र !

हिंदूंच्या निरपराध संतांवर टीका करणार्‍या पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी यांना हे चालते का ?

महाराष्ट्र विधीमंडळात ‘शक्ती’ कायद्याचे विधेयक सादर

शक्ती कायद्याचे विधेयकात आरोपीला २१ दिवसांत शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये फाशी आणि जन्मठेप या शिक्षांचाही समावेश आहे.

पुणे येथे इयत्ता आठवीतील मुलीच्या भ्रमणभाषवर येतात अश्‍लील संदेश

मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गहन होत चालला आहे, यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते.

वॉशिंग्टन (अमेरिका) येथील भारतीय दूतावासासमोरील म. गांधी यांचा पुतळा खलिस्तानी झेंड्याद्वारे झाकला !

सरकारने शेतकर्‍यांच्या आंदोलनातील खलिस्तानवाद्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी !

हिंदु नाव धारण करून धर्मांध तरुणाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण

देहलीमधील कायदा आणि सुव्यवस्था केंद्राच्या अखत्यारीत आहे. देशाच्या राजधानीत ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे वाढत आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने येथेही लव्ह जिहादविरोधी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

काँग्रेसला लागली घरघर !

​गेल्या ७० वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसने देशाची अवस्था एखाद्या धर्मशाळेप्रमाणे केली. देवभूमी आणि ऋषिभूमी असलेल्या भारतावर मोगलांप्रमाणे राज्य करून दैन्यावस्था करणार्‍या काँग्रेस पक्षाची स्थितीही केविलवाणी होणे, ही नियतीने तिला दिलेली शिक्षाच नसेल कशावरून ?