महाराष्ट्र विधीमंडळात ‘शक्ती’ कायद्याचे विधेयक सादर

  • २१ दिवसांत शिक्षेच्या तरतुदीसह फाशी आणि जन्मठेप या शिक्षांचा समावेश

  • विधेकावर चर्चा करण्याची विरोधी पक्षाची मागणी


मुंबई, १४ डिसेंबर (वार्ता.) – मागील वर्षापासून चर्चेत असलेल्या शक्ती कायद्याचे विधेयक १४ डिसेंबर या दिवशी विधानसभेच्या सभागृहात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडले. या विधेयकावर १५ डिसेंबर या दिवशी चर्चा होणार आहे. विरोधी पक्षाकडून या विधेयकावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. आंध्रप्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या पार्श्‍वभूमीवर हा कायदा आणला जात असून यामध्ये आरोपीला २१ दिवसांत शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये फाशी आणि जन्मठेप या शिक्षांचाही समावेश आहे.

सभागृह गुद्याच्या नव्हे, तर मुद्याच्या आधारे चालवावे ! – सुधीर मुनगंटीवार, भाजप

सुधीर मुनगंटीवार

विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी १० विधेयके मांडण्यात आली आहेत. या विधेयकांवर विस्तृत चर्चा व्हायला हवी. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी २ आठवडे इतका वाढवायला हवा. सभागृहात सादर केलेल्या सर्व विधेयकांवर चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे. सभागृह गुद्याच्या नव्हे, तर मुद्याच्या आधारे चालवावे.