चर्चच्या वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेमध्ये बलात्काराचा आरोप असणारे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांचे छायाचित्र !

लोकांकडून दिनदर्शिकेचा विरोध करत तिची जाळपोळ

हिंदूंच्या निरपराध संतांवर टीका करणार्‍या पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी यांना हे चालते का ?

कोल्लम (केरळ) – येथे ननवर बलात्कार केल्याचा आरोप असणारे रोमन कॅथॉलिक चर्चचे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांचे छायाचित्र वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेमध्ये प्रसिद्ध केल्यावरून येथील नागरिकांकडून विरोध केला जात आहे. लोकांकडून दिनदर्शिका जाळण्यात येत आहे. त्रिशूर येथे सायरो मलबार चर्चकडून ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे.

१. लोकांचे म्हणणे आहे की, प्रतिवर्षी चर्चकडून अल्प मूल्यामध्ये दिनदर्शिका दिली जाते. गेल्या २ वर्षांपासून मुलक्कल यांचे छायाचित्रे यामध्ये प्रसिद्ध केले जात आहे. गेल्या वर्षीही याचा विरोध करण्यात आला होता. आता पुन्हा यावर्षी त्यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.

२. चर्चचे म्हणणे आहे की, मुलक्कल यांच्या विरोधातील गुन्हा अद्याप सिद्ध न झाल्याने आम्ही त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध करतो.