पुणे येथे इयत्ता आठवीतील मुलीच्या भ्रमणभाषवर येतात अश्‍लील संदेश

मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गहन होत चालला आहे, यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते. अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी साधना करून स्वत:चे आध्यात्मिक बळ वाढवणे अपेक्षित !

पुणे – ‘ऑनलाईन’ शिक्षण घेणार्‍या इयत्ता आठवीतील मुलीच्या भ्रमणभाषमधील ‘झूम’ प्रणालीवर गेल्या काही मासांपासून अश्‍लील संदेश येत असून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात आहे. इतकेच नव्हे, तर मुलीचे वडील आणि मुख्याध्यापक यांच्या ‘ई-मेल’वरसुद्धा अश्‍लील संदेश येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्रकरण वाढत असल्याने मुलीच्या आईने भोसरी एम्.आय.डी.सी पोलिसांत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनाने सर्व पालक आणि मुले यांची बैठक घेऊन असे कुणासंबंधी घडल्यास तात्काळ पुढे येण्याचे आवाहन केले आहे.