वॉशिंग्टन (अमेरिका) येथील भारतीय दूतावासासमोरील म. गांधी यांचा पुतळा खलिस्तानी झेंड्याद्वारे झाकला !

  • शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कृत्य !

  • भारतीय दूतावासाकडून तीव्र निषेध

भारतात गेल्या २ आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपासून चालू असलेल्या पंजाब आणि हरियाणा राज्यांतील शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानवाद्यांचा समावेश असल्याचेच यातून उघड होते ! सरकारने आता या आंदोलनातील खलिस्तानवाद्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

वॉशिंग्टन (अमेरिका) – येथील भारतीय दूतावासासमोर असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. भारतातील कृषी कायद्यांचा विरोध करतांना भारतविरोधी गटाने पुतळ्यावर खलिस्तानी झेंडा टाकून त्याद्वारे गांधींचा तोंडवळा झाकून टाकला. भारतीय दूतावासाकडून या घटनेची माहिती देण्यात येऊन याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. दूतावासाने अमेरिकेतील कायदा यंत्रणेकडे निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.