Ahmed Khan Karnataka Congress : (म्हणे) ‘रेल्वे आणि बस यांना आग लावा, उठाव करा, मरा !’

कर्नाटकात वक्फ कायद्याला विरोध करतांना काँग्रेसचे नेते अहमद खान यांचा चिथावणीखोर व्हिडिओ प्रसारित !

दावणगेरे महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक अहमद कबीर उपाख्य अहमद खान

दावणगेरे (कर्नाटक) : वक्फ कायद्यातील सुधारणा स्वीकारणे शक्य नाही. केवळ निषेध केल्याने, फलक घेऊन फिरल्याने काही होणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना अर्ज देऊन मागण्या पूर्ण होणार नाहीत. सर्वांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. याविरोधात रेल्वे आणि बस यांना आग लावा, उठाव करा, तोडफोड करा, मरा, असे चिथावणीखोर आवाहन दावणगेरे महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक अहमद कबीर उपाख्य अहमद खान यांनी वक्फ कायद्याला विरोध करतांना केले.

त्यांच्या या संदर्भातील भाषणाचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित होत आहे. आझादनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करणारे काँग्रेसचे सरकार सत्तेत असल्याने त्याच्या नेत्यावर कधीतरी कारवाई होईल का ? उलट ज्या प्रमाणे बंगालमध्ये मुसलमान या कायद्यावरून हिंसाचार करत आहेत, तसा हिंसाचार कर्नाटकात यामुळे झाला, तर आश्चर्य वाटू नये !