बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी रेल्वेगाडीवरील आक्रमण, म्हणजे हिंसाचार अधिक वाढण्याची शक्यता !

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

‘पाकिस्तानाच्या अशांत प्रांत बलुचिस्तानमध्ये ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या स्वातंत्र्य सैनिकांनी एका रेल्वेगाडीवर आक्रमण केले आणि त्यात असलेल्या ३० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. त्यानंतर त्यांनी या गाडीतील प्रवाशांना बंधक बनवले. ही अतिशय गंभीर घटना आहे. याचे कारण की, या भागात चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून आर्थिक महामार्ग बांधण्यात येत आहे. तो बलुचिस्तानच्या ग्वादर बंदरातून निघून चीनच्या शीनझियांग प्रांतात पोचतो. हे बलुचिस्तानच्या लोकांना मान्य नाही. त्यांना वाटते की, या माध्यमातून त्यांच्या नैसर्गिक संपत्तीची लूट होत आहे. त्यामुळे बलुचिस्तानचे विविध गट हे तेथील चिनी लोक, पाकिस्तानी सैन्य आणि त्यांचे अर्धसैनिक दल यांच्यावर आक्रमणे करून राग व्यक्त करतात. हा हिंसाचार एवढा वाढला आहे की, या महामार्गाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने ३०-३५ सहस्र सैनिक तैनात केले आहेत. त्याखेरीज तेथे चीननेही त्यांची खासगी सुरक्षादले तैनात केली आहेत. एवढे करूनही तेथील हिंसाचार थांबवण्याचे लक्षण दिसत नाही. आता ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या स्वातंत्र्य सैनिकांनी रेल्वेगाडीचे अपहरण करून प्रवाशांना जे बंधक बनवले आहे, त्याचा अर्थ सरळ आहे की, येणार्‍या काळात तेथील हिंसाचार अधिक वाढण्याची शक्यता आहे.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे