Delhi Banned Firecrackers : देहलीत दिवाळीपूर्वी फटाके आणि त्‍यांचे ऑनलाईन वितरण यांवर बंदी !

नवी देहली – दिवाळीपूर्वी देहलीतील वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्‍यासाठी देहली  प्रदूषण नियंत्रण समितीने (‘डीपीसीसी’ने) १ जानेवारी २०२५ पर्यंत फटाक्‍यांवर बंदी घातली आहे. शासनाच्‍या आदेशानुसार फटाके बनवणे, साठवणे, विक्री करणे आणि वापरणे यांवर बंदी घालण्‍यात आली आहे. एवढेच नाही, तर फटाक्‍यांच्‍या ऑनलाईन वितरणावरही बंदी घालण्‍यात आली आहे.

१. या बंदीची कडक कार्यवाही करण्‍याचे दायित्‍व देहली पोलिसांवर सोपवण्‍यात आले आहे. पोलीस त्‍यांचा अहवाल प्रतिदिन ‘डीपीसीसी’ला सादर करतील.

२. देहली भाजपने फटाक्‍यांच्‍या बंदीच्‍या कारणावर प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले आहे. आम आदमी पक्षाच्‍या सरकारने कोणताही शास्‍त्रीय पुरावा सादर न करता फटाक्‍यांवर बंदी घातल्‍याचा आरोप भाजपने केला.

३. दिवाळीच्‍या रात्री फोडलेले फटाके प्रदूषणाचे कारण असल्‍याचे सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक अहवाल देहली सरकारने अद्याप सादर केलेला नाही, असेही भाजपने म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु सणांच्‍या वेळीच प्रदूषणाची आठवण होणारे हिंदुद्रोही ‘आप’चे सरकार !