केरळ उच्च न्यायालयाच्या फटाक्यांवरील बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार केरळ सरकार !

सर्वोच्च न्यायालय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने फटाक्यांवर लावलेल्या बंदीच्या विरोधात राज्यातील मंदिरांचे व्यवस्थापन पहाणारे सरकारी देवस्वम् बोर्ड आणि न्यास पुढे अपील करण्याचा विचार करत आहेत, असे केरळ सरकारच्या मंत्र्यांनी सांगितले आहे. ३ नोव्हेंबर या दिवशी उच्च न्यायालयाने निर्धारित वेळेनंतर फटाके फोडण्यास अनुमती नाकारली होती. या विरोधात मंदिरांचे व्यवस्थापक सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात, अशी माहिती अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्ग यांच्याशी संबंधित मंत्रालयाचे राज्यमंत्री के. राधाकृष्णन् यांनी ५ नोव्हेंबर या दिवशी दिली. राधाकृष्णन् पुढे म्हणाले की, मंदिरे, तसेच अन्य धार्मिक क्षेत्रांत फटाक्यांविना धार्मिक उत्सव साजरे करणे कठीण आहे.