राममंदिर वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसुलीचा काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांचा आरोप
अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राममंदिरासाठी वर्गणीच्या नावाने भाजपचे पुढारी खंडणी गोळा करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केला.
अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राममंदिरासाठी वर्गणीच्या नावाने भाजपचे पुढारी खंडणी गोळा करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केला.
धर्मप्रेमी हिंदू आणि रामभक्त यांच्या भक्तीमुळे आणि त्यागामुळे अयोध्येत श्रीराममंदिर उभारले जाईल, त्यासाठी एल्धोस कुन्नाप्ली यांच्यासारख्या काँग्रेसी नेत्यांच्या पैशांची हिंदूंना आवश्यकता नाही !
तोंड आहे म्हणून बरळणारे काँग्रेसचे आमदार ! देशात सर्वाधिक काळ सत्तेत असणार्या काँग्रेसवाल्यांनी देशाच्या विकासाचा किती निधी हडपला, हे जगाला ठाऊक आहे !
सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रीरामंदिरासाठी विशेष कार्य केलेल्या राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन श्रीचरणी पुष्पांजली समर्पित केली. त्याचप्रमाणे धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले.
येथील ८३ वर्षीय स्वामी शंकर दास यांनी श्रीरामंदिरासाठी १ कोटी रुपयांचे दान दिले आहे. स्वामी शंकर दास हे जवळपास ६० वर्ष ऋषिकेश येथील गुहेमध्ये ध्यान साधना करत आहेत.
प्रभु श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ५ लाख रुपयांचा निधी समर्पित केला आहे.
‘मनुष्याला मंदिर कशाला हवे ?’ अशा आशयाचे लिखाण असलेले पुस्तक सरकारनेच खरेदी करून त्याची प्रत प्रत्येक ग्रंथालयांत ठेवण्याच्या प्रक्रियेने शेवटचा टप्पा गाठला होता. यामुळे भाजपमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
मुसलमान देणग्या देत आहेत; म्हणून हिंदूंनी हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. ‘मंदिरांवर पुन्हा आक्रमण करू’ अशा धमक्याही धर्मांधांनी दिल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे संरक्षणही होणे महत्त्वाचे आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे !
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्य आता गतिमान झाले आहे. अयोध्येतील राममंदिर संपूर्ण जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल, असा विश्वास विश्व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.
काँग्रेसचे हे श्रीराममंदिराविषयीचे प्रेम म्हणजे ढोंग आहे, हे न कळण्याइतके हिंदू दूधखुळे नाहीत. काँग्रेसला खरेच श्रीराममंदिराविषयी काही करायचे असते, तर पक्षाने संपूर्ण देशात असे अभियान राबवले असते !