मनसे आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांकडून कानडे यांचा निषेध

नगर – अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राममंदिरासाठी वर्गणीच्या नावाने भाजपचे पुढारी खंडणी गोळा करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केला. कानडे यांच्या वक्तव्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निषेध करण्यात आला. श्रीरामपूरमधील श्रीराम मंदिर चौकात मनसे आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कानडे यांचा निषेध केला. कानडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. कानडे यांनी क्षमा मागावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी बोलतांना कानडे यांनी हा आरोप केला. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही त्यांचे नाव न घेता कानडे यांनी टीका केली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल