मुसलमान देणग्या देत आहेत; म्हणून हिंदूंनी हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. ‘मंदिरांवर पुन्हा आक्रमण करू’ अशा धमक्याही धर्मांधांनी दिल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे संरक्षणही होणे महत्त्वाचे आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्या श्रीराममंदिरासाठी देशातील भाविकांकडून देणग्या गोळा करण्यात येत असतांना अयोध्येतील काही मुसलमानांनीही मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत. वासी हैदर यांनी १२ सहस्र, तर शाहबानो यांनी ११ सहस्र रुपये देणगी दिली आहे. बाबरी मशिदीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे की, मीही मंदिरासाठी देणगी देणार आहे. जर मुसलमान मंदिरासाठी दान देतील, तर ते एकतेला प्रोत्साहन देणारे ठरील.
१. स्थानिक मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) सिराजुद्दीन यांनी म्हटले की, मुसलमानांनी हिंदूंच्या आनंदाच्या प्रसंगामध्ये भागीदार व्हायला हवे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. दान देणे आवश्यक आहे; मग ते १ रुपयाचे असले, तरी हरकत नाही.
२. अधिवक्ता आणि सामाजिक कार्यकर्ते सय्यद ताहिर अली यांनी म्हटले की, हिंदूंच्या श्रीरामावरील श्रद्धेचा सन्मान करून मुसलमानांनी दान दिले पाहिजे.