श्रीराममंदिरासाठी ४४ दिवसांत २ सहस्र १०० कोटी रुपयांचे दान झाले गोळा !

जर श्रीराममंदिरासाठी खर्च झाल्यानंतर यातील पैसे शिल्लक रहाणार असतील, तर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने देशातील दुर्लक्षित आणि पडझड झालेल्या पुरातन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी ते पैसे व्यय करावेत, असे हिंदूंना वाटते !

श्रीराममंदिर

नवी देहली – अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी देणग्या गोळा करण्याच्या जानेवारी मासामध्ये चालू झालेल्या अभियानामुळे आतापर्यंत २ सहस्र १०० कोटी रुपयांचे दान गोळा झाले आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी ही माहिती दिली.

स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले की, गेल्या ४४ दिवसांत ही देणगी जमा झाली आहे. परदेशात रहाणार्‍या रामभक्तांनीही इतर देशांमध्येही अशीच मोहीम चालू करावी, अशी मागणी केली आहे. अशा लोकांकडून देणगी कशी गोळा करावी, याविषयी पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल.