अयोध्येत श्रीराममंदिराचा पाया खोदतांना सापडल्या मूर्ती आणि चरणपादुका !

सध्या श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिर उभारण्यासाठी भूमीचे सपाटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोदकाम करतांना प्राचीन ‘सीतामाता की रसोई’ मंदिर स्थळी चरणपादुका, चौकट आणि खंडित देवमूर्तींचे अवशेष आढळून आले.

श्रीलंकेत जेथे सीतामातेला बंदी बनवून ठेवण्यात आले होते, तेथील दगड श्रीराममंदिराच्या बांधकामासाठी आणणार !

येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिरासाठी श्रीलंकेत ज्या ठिकाणी रावणाने सीतामातेला बंदी बनवून ठेवले होते, त्या ‘सीता एलिया’ तेथील एक दगडही याच्यासाठी वापरण्यात येणार आहे. हा दगड श्रीलंकेचे उच्चायुक्त मिलिंडा मोरागोडा यांच्या माध्यमातून भारतात आणण्यात येणार आहे.

श्रीराममंदिरासाठी आवश्यकतेपेक्षा दुप्पट रक्कम गोळा झाल्याने घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे बंद !

मंदिराला लागणार्‍या पैशांपेक्षा अधिक गोळा झालेल्या रकमेचा व्यय देशातील जीर्णावस्थेत असलेल्या प्राचीन आणि मोठ्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी करावा, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी धर्मशिक्षण देणारी केंद्रे उघडावीत, असेच हिंदूंना वाटते !

श्रीराममंदिर ७० नाही, तर १०७ एकरमध्ये उभारण्यात येणार !

श्रीराममंदिराचे बांधकाम चालू आहे. येथे आता ७० नाही, तर १०७ एकरमध्ये हे मंदिर आणि त्याचा परिसर असणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्र्स्टने मूळ ७० एकर भूमीच्या शेजारील भूमी विकत घेतली आहे.

श्रीराममंदिर ७० नाही, तर १०७ एकरमध्ये उभारण्यात येणार !

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मूळ ७० एकर भूमीच्या शेजारील भूमी विकत घेतली आहे.

श्रीराममंदिरासाठी ४४ दिवसांत २ सहस्र १०० कोटी रुपयांचे दान झाले गोळा !

जर श्रीराममंदिरासाठी खर्च झाल्यानंतर यातील पैसे शिल्लक रहाणार असतील, तर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने देशातील दुर्लक्षित आणि पडझड झालेल्या पुरातन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी ते पैसे व्यय करावेत, असे हिंदूंना वाटते !

राममंदिर वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसुलीचा काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांचा आरोप 

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राममंदिरासाठी वर्गणीच्या नावाने भाजपचे पुढारी खंडणी गोळा करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केला.

रा.स्व. संघाने फसवून श्रीराममंदिरासाठी देणगी घेतल्याचे सांगत केरळमधील काँग्रेसच्या आमदाराचा थयथयाट !

धर्मप्रेमी हिंदू आणि रामभक्त यांच्या भक्तीमुळे आणि त्यागामुळे अयोध्येत श्रीराममंदिर उभारले जाईल, त्यासाठी एल्धोस कुन्नाप्ली यांच्यासारख्या काँग्रेसी नेत्यांच्या पैशांची हिंदूंना आवश्यकता नाही !

(म्हणे) ‘भाजपवाले श्रीराममंदिराच्या देणग्या गोळा करून त्या पैशांतून रात्री मद्यपान करतात !’ – काँग्रेसच्या आमदाराचा आरोप

तोंड आहे म्हणून बरळणारे काँग्रेसचे आमदार ! देशात सर्वाधिक काळ सत्तेत असणार्‍या काँग्रेसवाल्यांनी देशाच्या विकासाचा किती निधी हडपला, हे जगाला ठाऊक आहे !

राममंदिराची देशवासियांची प्रतीक्षा लवकरच पूर्ण होईल ! – मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व. संघ

सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रीरामंदिरासाठी विशेष कार्य केलेल्या राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन श्रीचरणी पुष्पांजली समर्पित केली. त्याचप्रमाणे धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले.