सोमनाथ मंदिराला पाडणार्‍या गझनीचे कौतुक करणार्‍या मौलानाच्या विरोधात गुन्हा नोंद

सोमनाथ मंदिराला लुटणार्‍या महंमद गझनी याचे कौतुक करणार्‍या मौलानाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध चालू केला आहे

नांदगाव शिंगवे (जिल्हा नगर) येथील हनुमान मंदिरात अज्ञातांनी चटया जाळल्या !

केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशात असे प्रकार घडत असतांना ते रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !

मंदिरांवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाविरोधात व्यापक जनजागृतीसह कडाडून विरोध करण्याचा विश्‍वस्तांचा निर्धार !

बेळगाव येथे देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ कर्नाटकच्या वतीने मंदिर विश्‍वस्तांची बैठक.

हिंदु देवतांच्या नावाने व्यंगचित्र आणि महंमद पैगंबर यांच्या नावाने क्षमायाचना !

हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर यथेच्छपणे चिखलफेक करून अवमान करणार्‍या ‘बीबीसी’चा हिंदुद्वेष जाणा आणि हिंदूंनी स्वतःचे संघटन प्रभावी करून ‘बीबीसी’ला हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्यापासून रोखा !

भारतीयत्वाच्या रक्षणार्थ सिद्ध व्हावे !

बहुसंख्यांक असलेल्या हिंदु समाजाचा विचार केल्यास आपल्याकडे #HinduLivesMatter या नावाने मोहिमा, आंदोलने, ऑनलाईन अभियान राबवावी लागतात. एकंदरीत, या तीनही राज्यांतील हिंदूंनी भारतीयत्वाच्या रक्षणार्थ स्वतःचे मत देणे, ही काळाची निकड आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसायला हवी, हेच खरे !

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

केरळच्या तेनिपलम् शहरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेने मोपला हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ ती घटना साजरी करण्यासाठी मिरवणूक काढली होती. या हत्याकांडामध्ये धर्मांधांनी सहस्रो हिंदूंचा नरसंहार केला होता.

पत्रकार दिलीप मंडल यांच्याकडून श्री सरस्वतीदेवीविषयी अश्‍लील ट्वीट

भारतात अशा कृत्यांसाठी कठोर कायदा नसल्याने धर्मद्रोह्यांचे फावते ! केंद्रातील भाजप सरकारने हिंदूंच्या देवतांचा विविध माध्यमांतून होणारा अवमान रोखण्यासाठी पाकमध्ये असलेल्या ईशनिंदा विरोधी कायद्याप्रमाणे कायदे करणे आवश्यक !

हिंदु महिलांविषयी अश्‍लाघ्य टिपणी असलेल्या कादंबरीला केरळ साहित्य अकादमीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीचा पुरस्कार !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. साम्यवादी आघाडी सरकार सत्तेत असलेल्या केरळमधील साहित्य अकादमीकडून याहून वेगळी अपेक्षा तरी काय करणार ? हिंदूंनी याविरोधात संघटित होणे आवश्यक आहे.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे भूमीच्या वादातून धर्मांधांकडून महंत मुनि बजरंग दास यांच्यावर प्राणघातक आक्रमण

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना सातत्याने हिंदूंचे संत, महंत आणि पुजारी यांच्यावर आक्रमणे होत आहेत, तसेच हत्या होत आहेत. हे हिंदूंना अपेक्षित नाही ! आता प्रशासनाने धर्मांधांवर वचक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत !

ओटीटी अ‍ॅप्सवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार विचार करत आहे !

ओटीटी अ‍ॅप्सवरील वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान करण्यात येत असून हा प्रकार गेले अनेक मास चालू आहे. अनेक संघटना याचा विरोध करत असतांना सरकार अजून विचारच करत आहे, हे राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मप्रेमी यांना अपेक्षित नाही !