राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १५.२.२०२१ 

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

(म्हणे) ‘साधूंवर मुळीच विश्‍वास ठेवू नका, त्यांच्यासारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत !’ – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा काँग्रेसचे नेते

क्षाचे मिंधे असलेल्या वडेट्टीवार यांच्या डोळ्यांवर पट्टी असली, तरी पात्र कोण आणि अपात्र कोण, हे जनतेला ठाऊक आहे ! हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या काँग्रेसवाल्यांना हिंदूंनीच देशातून हद्दपार करायला हवे !

काँग्रेसचे मंत्री मौलवी आणि पाद्री यांच्याविषयी असे बोलतील का ?

‘साधूंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत’, असे विधान महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अन् काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात केले.

देहलीमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांची धर्मांधांकडून निर्घृण हत्या !

हिंदूंनो, देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याविना हिंदूंचे आणि हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील व्हा !

कोल्हापूर आणि सांगली येथील प्रसिद्ध केबलवाहिन्यांनी घेतल्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती !

कोल्हापूर येथील समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी, तर सांगली येथील समितीचे श्री. संतोष देसाई यांनी या मुलाखतींच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे वाढणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती यांविषयी समाजाचे प्रबोधन केले.

राजकारण्यांना वगळून शांततापूर्ण, कायदेशीर आणि सर्वसमावेशक धर्मचळवळ प्रारंभ करण्याचा निर्णय

हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांसाठी साधू संतांना प्रयत्न करावे लागतात, हे हिंदु राजकीय नेत्यांना लज्जास्पद ! मंदिरांचे रक्षण आणि संतांना धर्मशिक्षणासाठी वेळ देण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

(म्हणे) ‘आम्ही शरजील उस्मानी याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत !’

हिंदूंना ‘सडलेले’ म्हणणार्‍या आणि बाबरी मशीद पुन्हा बनवण्याचे आव्हान देऊन कायदा अन्सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍या आणि व्यक्तीची पाठराखण करणे, हा एकप्रकारे राष्ट्रद्रोहच नव्हे का ?

जालंधर (पंजाब) येथे अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात मंदिराचे पुजारी घायाळ

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या मंदिरांचे पुजारी असुरक्षित !

‘ओटीटी’ माध्यमावरील आशय नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमावली करणार ! –  प्रकाश जावडेकर

वास्तविक सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि राष्ट्रविरोधी असणार्‍या वेब मालिकांवर स्वतःहून कारवाई करत त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू करणे आवश्यक होते !

हिंदूंचे वाढलेले दायित्व !

हिंदूंना स्वतःचे रक्षण करायचे असेल, तर हिंदूंनी धर्मबळ वाढवणे आवश्यक आहे. धर्मबलसंपन्न हिंदूच धर्मांधांवर वचक निर्माण करू शकतील, हे निश्‍चित !