‘बीबीसी हिंदी’ची दुहेरी मानसिकता
भारतामध्ये साम्यवादी माध्यमांपासून ते उदारतावादी टोळ्यांपर्यंत सर्वांनाच असहिष्णुता, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि ‘फॅसिस्टवाद’ हे विषय आवडते राहिले आहेत. त्याच वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा घेतल्याचा दावा करणारे डावे ‘मीडिया हाऊसेस’ हिंदूंवर असहिष्णुता वाढवण्याचा आरोप करत आले आहेत. आजही हिंदूंच्या विरोधात वाटेल तसे आणि पाहिजे तेव्हा द्वेष पसरवण्याचे काम चालू आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने त्रिशूळ आणि शिवलिंग यांच्यावर कंडोम चढवून हिंदूंविषयी घृणास्पद गोष्ट समोर मांडण्यात आली, तर कधी हिंदूंची आराध्य देवता दुर्गामातेला अपमानित करण्यात आले. केवळ हिंदुद्वेषी बातम्याच देण्यात आल्या नाहीत, तर व्यंगचित्र, विखारी लेख, यू ट्यूब चित्रफीती यांपासून दूरचित्रवाहिन्या आणि चित्रपट यांच्या माध्यमातूनही हिंदु धर्मांला लक्ष्य करणे चालू राहिले. या संदर्भात कुणी कधीतरीच आक्षेप नोंदवला असेल.
‘बीबीसी हिंदी’ने पैगंबर महंमद यांच्याविषयीची कथित ध्वनीचित्रफीत ‘डिलीट’ करणे
साम्यवादी संघटनांमधील ‘बीबीसी’ या कुप्रचार यंत्रणेला मुसलमान संघटनांनी नुकतेच लक्ष्य केले. बीबीसीने ‘पाकिस्तानच्या या निर्णयामुळे अहमदिया मुसलमानांमध्ये भीती कशासाठी आहे ?’ हे शीर्षक असलेल्या एका ध्वनीचित्रफितीत कथितपणे पैगंबर महंमद यांचे चित्र दाखवले. याविषयी रझा अकादमी या धर्मांध संघटनेने आक्षेप घेतला. त्यानंतर ‘बीबीसी हिंदी’ने त्यांच्या वाहिनीवरून ही चित्रफीत ‘डिलिट’ केली. एवढेच नाही, तर त्यांनी या संघटनेची क्षमाही मागितली आहे.
बीबीसीच्या संकेतस्थळावर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा सर्रास अवमान
याच बीबीसीने हिंदूंच्या श्रद्धास्थानांना एकदा नव्हे, तर अनेकदा लक्ष्य केले आहे. त्यांनी अनेक वेळा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने हिंदुविरोधी कार्यक्रम रेटले आहेत.
उदा. बीबीसीने एका व्यंगचित्राचे समर्थन केले, ज्यामध्ये सीता श्रीरामाला म्हणते, ‘मला रामभक्तांनी बंदी बनवण्यापेक्षा रावणाने बंदी केले होते, याचा मला आनंद आहे.’ या व्यंगचित्राच्या माध्यमातून रामभक्त अत्याचारी असतात, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात ‘जय श्रीराम’ या घोषणेला बीबीसीने ‘मर्डर क्राय’ म्हटले आहे.
विशेष म्हणजे अशा बातम्या, व्यंगचित्रे, ध्वनीचित्रफिती आजही बीबीसीच्या संकेतस्थळावर आहेत. (हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर यथेच्छपणे चिखलफेक करून अवमान करणार्या ‘बीबीसी’चा हिंदुद्वेष जाणा आणि हिंदूंनी स्वतःचे संघटन प्रभावी करून ‘बीबीसी’ला हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्यापासून रोखा ! – संपादक)