देहलीत हिंसाचार भडकावल्याचा कुख्यात गुंड लक्खा सिधाना आणि अभिनेता दीप सिद्धू यांच्यावर आरोप !

एक कुख्यात गुंड जमावाचे नेतृत्व करून हिंसाचार घडवत असेल, तर ते पोलिसांसाठी लज्जास्पद ! हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणार्‍यांचा ‘बोलविता धनी कोण’, तेही समोर येणे आवश्यक !

प्रजासत्ताकदिनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या ४ धर्मांध तरुणांना अटक

अशा देशद्रोह्यांना आता फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे !

देहलीत शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार ! : दोघांचा मृत्यू  

अशा प्रकारे हिंसा करून सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याच्या प्रकरणी आणि हिंसाचार्‍यांवर नियंत्रण न केल्याच्या प्रकरणी शेतकरी आणि पोलीस दोघांकडून हानी वसूल केली पाहिजे !

आंदोलन चिघळवले !

काँग्रेसच्या काळात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या, स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या कायद्यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रदिनी जय जवान घोषणेच्या दिवशी जय किसान घोषणा होणे अपेक्षित होते. आपत्काळाच्या अनुषंगाने पुढील काळ यापेक्षाही कठीण स्थिती घेऊन येणार आहे. त्याची ही नांदीच म्हणावी लागेल !

काँग्रेसवाल्यांनीच नेताजी बोस यांची हत्या घडवून आणली ! – खासदार साक्षी महाराज यांचा आरोप

केंद्रात साक्षी महाराज यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यांनी सरकारला सांगून नेताजी बोस यांच्या मृत्यूची चौकशी करून सत्य स्थिती देशासमोर आणावी !

राजधानी देहलीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

कराची, लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी या पाकमधील शहरांमध्ये कधी ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस कुणी करू शकेल का ? मग भारतात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस होतेच कसे ?

(म्हणे) ‘काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील !’ – जावेद अख्तर, गीतकार

चीन भारताचा शत्रू आहे. अख्तर यांना शत्रूच्या देशाची संस्कृती दर्शवणारे फळाचे नाव मिरवण्यात धन्यता वाटत असेल, तर त्यांची निष्ठा शत्रूच्या देशाशी आहे, असेच समजावे का ? अशा राष्ट्राभिमानशून्य आणि शत्रूप्रेमी कलाकारांची भारताला आवश्यकता नाही !

बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन, पोलीस आणि शिक्षण विभाग यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !

(म्हणे) ‘उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र हटवा !’ – काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांची मागणी

शिळ्या कढीला उकळी देण्याचा काँग्रेसचा नेहमीचा प्रयत्न ! काँग्रेसवाल्यांना सावरकर आजन्मात कळणार नाहीत आणि ते अशा प्रकारची हास्यास्पद मागणी करत रहातील !

‘टुकडे आणि तैमुर गँग’ला दणका !

जे.एन्.यू. विद्यापिठातील कित्येक अपप्रकार आणि देशद्रोही वातावरण दाखवण्याचे धैर्य या मालिकेच्या निर्मार्त्यांमध्ये नाही. कलेच्या अभिव्यक्तीच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांच्या विडंबनासमवेतच आता देशद्रोही विचारसरणीचा उदो उदो दाखवण्याची नवरूढी चित्रपट आणि वेब सिरीज यांत निर्माण झाली आहे.