बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन, पोलीस आणि शिक्षण विभाग यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !

बेळगाव येथे पोलीस आयुक्त डॉ. के. थियगराजन (डावीकडे बसलेले) यांच्याशी चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

बेळगाव, २१ जानेवारी (वार्ता.) – प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त डॉ. के. थियगराजन, शिक्षणाधिकारी डॉ. ए.बी. पुंडलिक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री सदानंद मासेकर, विश्‍वनाथ कावळे, समाजसेविका सौ. माधुरी जाधव, कर्तव्य महिला मंडळाच्या सौ. अक्काताई सुतार, सौ. मीलन पवार, कु. प्रणाली पवार, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर आणि सौ. उज्ज्वला गावडे उपस्थित होत्या. या वेळी शिक्षणाधिकार्‍यांनी ‘सर्व शाळांमध्ये परिपत्रक काढू’, असे आश्‍वासन दिले.

बेळगाव येथे शिक्षणाधिकारी (उजवीकडे बसलेले) यांच्याशी चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते