(म्हणे) ‘काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील !’ – जावेद अख्तर, गीतकार

  • जे इतिहास विसरतात त्यांना भविष्य नसते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हा हिंदूंच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास आहे. त्यांच्यासह हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या धर्मांधांची शहारांना दिलेली नावे पालटणे हे हिंदूंचे वर्तमान कर्तव्य आहे. अख्तर यांना याचा त्रास होत असेल, त्यांनी त्यांना आवडणार्‍या नावाच्या देशात निघून जावे !
  • चीन भारताचा शत्रू आहे, असे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला वाटते. अख्तर यांना शत्रूच्या देशाची संस्कृती दर्शवणारे फळाचे नाव मिरवण्यात धन्यता वाटत असेल, तर त्यांची निष्ठा शत्रूच्या देशाशी आहे, असेच समजावे का ? अशा राष्ट्राभिमानशून्य आणि शत्रूप्रेमी कलाकारांची भारताला आवश्यकता नाही !

मुंबई – गुजरातचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले की ‘ड्रॅगन फ्रूट’ हे कमळासारखे दिसते. त्यामुळे त्याचे नाव ‘कमलम्’ असे असायला हवे. शानदार. पहिले शहरांची नावे आणि आता फळांची. काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील. खरेच हे सर्व मजेदार आहे, असे अत्यंत उपाहासात्मक ट्वीट हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्तर यांनी केले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ‘ड्रॅगन फ्रूट’चे नाव ‘कमलम्’ असे केले आहे. सध्या औरंगाबाद आणि धाराशिव यांची नावे पालटण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर अख्तर यांनी वरील ट्वीट केले आहे. (अख्तर, नसिरउद्दीन शाह यांसारख्यांना साम्यवादी पत्रकरांप्रमाणेच अशी व्यक्तव्ये करण्यासाठी कुठून पैसा येतो कि काय, अशा शंका राष्ट्रप्रेमींना आल्यास चूक ते काय ? – संपादक)