राजधानी देहलीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

  • देशाच्या राजधानीत देशद्रोह्यांचा भरणा असेल, तर अन्य ठिकाणांचा विचारही न केलेला बरा !
  • कराची, लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी या पाकमधील शहरांमध्ये कधी ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस कुणी करू शकेल का ? मग भारतात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस होतेच कसे ? अशा देशद्रोह्यांना आता फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे !

नवी देहली – येथील खान मार्केट भागात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. मध्यरात्री या घोषणा देण्यात आल्यानंतर पोलिसांनी २ पुरुष आणि ३ महिला यांना येथून कह्यात घेतले आहे. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात येत आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांना दूरभाषवरून काहीजण घोषणाबाजी करत असल्याची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोचले होते.

 (सौजन्य : DB Live)

तेथे त्यांना २ पुरुष आणि ३ महिला दुचाकीवर बसून ती जोरात पळवण्याची शर्यत लावत असल्याचे दिसले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले, ‘आम्ही परस्परांचा त्यांच्या देशांच्या नावांवरून पुकार करत होतो. त्यांतील एक जण पाकिस्तानातून आला होता. त्याने ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा दिली’ असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात सध्या त्यांची चौकशी चालू आहे.