सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पाला कारिवडेवासियांचा विरोध

‘‘प्रदूषणकारी आणि लोकांच्या आरोग्याच्या जिवावर उठणारा हा प्रकल्प राबवतांना स्थानिक लोकांना विश्‍वासात घेतले जात नाही. नगरपरिषदेचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव धरण गावातील इयत्ता चौथीतील विद्यार्थी प्रतीदिन मद्य पिऊन धिंगाणा घालतात !  

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! लहान मुले आणि पुरुष यांनी मद्य पिऊन घरातील महिलांना त्रास देणे असे गंभीर चित्र गावात निर्माण होणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दृष्टीने लज्जास्पद !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जानेवारीला विविध ठिकाणी विविध मागण्यांसाठी उपोषण आंदोलने

देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांचे (धरणग्रस्तांचे) सुमारे २२ वर्षांपूर्वी लोरे-फोंडा माळरानावर पुनर्वसन करण्यात आले; मात्र अद्यापही प्रकल्पग्रस्त प्रमुख नागरी सुविधांपासून वंचित आहेत.

कतरास (झारखंड) येथे धर्माभिमान्यांकडून ‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात तक्रार

‘तांडव’ या वेब सिरीजच्या विरोधात येथील धर्माभिमानी श्री. दीपक केशरी यांनी ऑनलाइन तक्रार करून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

परमेश्‍वराची कृपा आणि त्याचे सामर्थ्य !

जीवनात कठीण गोष्ट सहज साध्य झाली की, अनेक जण ‘योगायोग’ असे म्हणून काही क्षणांतच त्याचा निवाडा देऊन टाकतात. अर्थात् अशा मंडळींमध्ये बहुसंख्य लोक नास्तिक आणि बुद्धीप्रामाण्यवादी असतात.

बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकावण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले

या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठाण मांडले. जोपर्यंत भगवा फडकावणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

‘तांडव’च्या विरोधात कारवाई केली जाईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र

देवतांचे विडंबन असलेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजविषयी तक्रार आली असून करवाई होईल; पण ‘ओटीटी’वर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी कायदा आणावा, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

आजपासून प्रकल्पग्रस्त जे.एन् पी.टी.तील बोटी रोखणार

आंदोलक मागण्यांसाठी होड्या आडव्या करून, जे.एन्.पी.टी. बंदरातील आंतराष्ट्रीय जलवाहतुकीशी संबंधित जहाजे रोखणार आहेत.

केंद्र सरकारच्या विरोधात अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून शेवटचे उपोषण

आजही शेतकर्‍यांना दूध, भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकून द्यावी लागतात. हे सहन होत नाही आणि वाईट वाटते- अण्णा हजारे

रेडी गावात रोजगार निर्मितीच्या मागणीसाठी २६ जानेवारीपासून उपोषण करण्याची ग्रामस्थांची चेतावणी

प्रशासन ग्रामस्थांचे रोजगाराचे प्रश्‍न सोडवत नाही; म्हणून स्थानिकांना अशा मागण्या कराव्या लागतात !