उत्तरप्रदेश सरकारकडून ‘लव्ह जिहाद’विरोधातील कायद्यासाठी विधी विभागाकडे प्रस्ताव सादर

उत्तरप्रदेश राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात असा कायदा करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

वीजदर योग्य न केल्यास आंदोलन करण्याची चेतावणी 

वाढीव विद्युत् दराला स्थगिती द्यावी आणि दळणवळण बंदी काळातील विजेचे उपकर आकारू नये या मागणीकडे कानाडोळा केल्याने उद्योगक्षेत्रामध्ये ताण निर्माण झाला आहे. वीजदर सुटसुटीत न केल्यास आंदोलन उभारण्याची चेतावणी संघटनांच्या वतीने देण्यात आली आहे.

वणी विभागात एकही शासकीय कापूस खरेदी केंद्र चालू नाही

या विभागातील एकही शासकीय कापूस खरेदी केंद्र चालू झाले नाही; त्यामुळे व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची सर्रास लूट होत आहे. आधीच परतीच्या पावसाने हतबल झालेला शेतकरी, त्यात बोंडअळीने ग्रस्त आणि तशातून निघालेल्या कापूस खरेदीसाठी शासकीय केंद्र नाही, अशी दैनावस्था शेतकर्‍यांची झाली आहे.

‘विजयनगर’ कर्नाटकातील ३१ वा जिल्हा; बळ्ळारी जिल्ह्याचे विभाजन

१८ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर बळ्ळारी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येणार असल्याची माहिती कायदामंत्री मधुस्वामी यांनी दिली आहे. त्यामुळे विजयनगर या नवीन जिल्ह्याला कर्नाटकातील ३१ वा जिल्हा म्हणून मान्यता मिळणार आहे.

श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत वाढ

श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ करण्यात आली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांच्या अहवालाच्या आधारे १० नोव्हेंबरपासून प्रवेशबंदीत वाढ केली आहे.

(म्हणे) ‘डोळे फोडून आंधळे केले जाईल !’

अशी धमकी देणार्‍या चीनचे दात जगाने घशात घातले पाहिजेत, असेच कुणालाही वाटेल !

काँग्रेसचे ‘लव्ह जिहाद’वरील प्रेम जाणा !

राजस्थानचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणतात, ‘‘धार्मिक सौहार्द बिघडवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ या शब्दाची निर्मिती भाजपद्वारे करण्यात आली आहे. अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा आणणे हे राज्यघटनाविरोधी आहे.’’

केंद्र सरकारकडून सुदर्शन टीव्हीच्या यु.पी.एस्.सी. जिहाद कार्यक्रमाला अनुमती

केंद्रातील भाजप सरकारने सुदर्शन टीव्ही या खासगी वृत्तवाहिनीवरील बिंदास बोल या साप्ताहिक कार्यक्रमातून यु.पी.एस्.सी. जिहाद या विषयाच्या कार्यक्रमाला काही पालट करून प्रसारित करण्याची अनुमती दिल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची अमानुष मारहाण करून हत्या

गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही नेहमी लोकशाहीच्या रक्षणाच्या गप्पा मारणारे राजकीय पक्ष यांवर मौन का बाळगून आहेत ? बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होणार्‍या हत्यांमुळे त्यांना आनंद मिळतो का ?

इन्सुली ग्रामस्थांचे मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यात बसून खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन !

अनुमाने २ घंटे केलेल्या या आंदोलनामुळे येथे वाहतुकीची कोंडी झाली. त्यानंतर महामार्ग विभागाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी ‘८ दिवसांत खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करतो’, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर इन्सुली ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. (