‘विजयनगर’ कर्नाटकातील ३१ वा जिल्हा; बळ्ळारी जिल्ह्याचे विभाजन

बेळगाव – १८ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर बळ्ळारी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येणार असल्याची माहिती कायदामंत्री मधुस्वामी यांनी दिली आहे. त्यामुळे विजयनगर या नवीन जिल्ह्याला कर्नाटकातील ३१ वा जिल्हा म्हणून मान्यता मिळणार आहे. कर्नाटकातील होस्पेट, कंपली, हगरीबोम्मनही, कोट्टर, हडगाली आणि हरपनही हे तालुके विजयनगर जिल्ह्यात येणार असून जिल्हा मुख्यालय म्हणून होस्पेट राहील. ऐतिहासिक विजयनगर साम्राज्यामुळे या नवीन जिल्ह्याचे नामकरण ‘विजयनगर’ करण्यात आले आहे.