(म्हणे) ‘डोळे फोडून आंधळे केले जाईल !’

हाँगकाँग प्रकरणी चीनची मित्र देशांना धमकी

अशी धमकी देणार्‍या चीनचे दात जगाने घशात घातले पाहिजेत, असेच कुणालाही वाटेल !

बीजिंग (चीन) – अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा यांचे ५ डोळे असोत कि १० असोत, आम्हाला काही फरक पडत नाही. जर ते चीनच्या सार्वभौमत्त्व, संरक्षण आणि विकास यांच्या संदर्भातील हितांना हानी पोचवतील, तर त्यांनी त्यांच्या डोळ्यांविषयी सावध रहायला हवे अन्यथा हे डोळे फोडून आंधळे करता येऊ शकते, अशी धमकी चीनने हाँगकाँगच्या सूत्रावरून या देशांना दिली आहे. चीनने त्याच्या विरोधी लोकांना हाँगकाँगच्या संसदेत निवडूून येऊ नये म्हणून विशेष नियम बनले आहेत. त्याचा या पाचही देशांनी विरोध केला आहे. त्यांनी हा नियम मागे घेण्याची मागणी केली आहे. या विरोधासाठी त्यांनी ‘फाईव्ह आईज’ नावाची संघटना स्थापन केली आहे. त्यावरून चीनने वरील शब्दांत धमकी दिली आहे.

१. चीनच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, चीन कधीच कोणती समस्या निर्माण करत नाही आणि कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. पाश्‍चात्त्य देशांनी हे स्वीकारले पाहिजे की, चीनने ब्रिटनकडून हाँगकाँग परत घेतलेले आहे.

 (सौजन्य : CNA)

२. ब्रिटनने वर्ष १९९७ मध्ये एका करारानुसार चीनला हाँगकाँग शहर परत दिलेले आहे; मात्र यात ५० वर्षांनंतर स्थानिक प्रकरणात हाँगकाँगला स्वायत्तता देण्यात येईल, अशी अटही घातलेली आहे.