विनामास्क फिरणार्‍यांवर मालवण नगरपरिषदेची कारवाई

मालवण नगर परिषदेकडून  शहरात कोरोनाविषयक नियमांची काटेकोर कार्यवाही करतांना गेले काही मास विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढल्याने पालिकेने केलेल्या कारवाईत मागील  १० दिवसांत १० सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी धुळखात पडून !

शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने धुळखात पडून आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांना वाहने कुठे लावायची, असा प्रश्‍न पडत आहे.

कोल्हापूर महापालिका प्रशासक पद स्वीकारल्यानंतर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पहिल्याच दिवशी लावली सर्वांना शिस्त !

विलंबाने कामावर आलेल्या कर्मचार्‍यांना कारवाईच्या नोटिसा दिल्या, तर विना‘मास्क’ कामावर आलेल्यांकडून ३ सहस्र २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिका चौकातील वाहनतळात लावण्यात आलेली वाहने बाहेर काढण्यात आली.

नृसिंहवाडीतील (जिल्हा कोल्हापूर) दत्त मंदिरात नियमांचे पालन करत भाविकांकडून दर्शन

मंदिर खुले झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्येही चैतन्यमय वातावरण पहावयास मिळाले.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पुण्यातील सार्वजनिक छठ पूजेस बंदी

भाविकांनी छठ पूजा घरगुती पद्धतीने खासगी जागेत साजरी करावी असे आवाहन पालिकेने केले आहे.

भोपाळ येथील काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांच्या विरोधात अटक वॉरंट

फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या विरोधात दिले होते भडकावू भाषण ! फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी महंमद पैगंबर यांच्याविषयी विधान केल्यावर भारतात त्याचा विरोध ? किती हिंदू आणि त्यांचे लोकप्रतिनिधी भारतात त्याच्या देवतांचा अवमान केल्यावर त्याला विरोध करतात ?

माकपकडून जातीच्या आधारे भेदभाव केल्याचा आरोप करत दलित महिला इस्लाम स्वीकारण्याच्या सिद्धतेत !

माकप एक ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी पक्ष ! एरव्ही दलितांच्या नावाने राजकारण करणारे बहुतेक राजकीय पक्ष आता तोंड का उघडत नाहीत ? या महिलेने इस्लाम स्वीकारू नये, यासाठी हिंदु संघटनांनीही प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

सीबीआय चौकशीसाठी राज्यांची अनुमती घेणे आवश्यक !  – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) चौकशीसाठी संबंधित राज्याकडून अनुमती घेणे बंधनकारक आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, ही तरतूद घटनेच्या संघराज्य या वर्णनाशी संबंधित आहे.

राज्यातील शाळा चालू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाला काळजी घेण्याच्या सूचना

शाळांना सॅनिटायझर, थर्मलगन, ऑक्सिमीटर अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे

भोगावती नदीला दूषित पाणी, मृत माशांचा खच

भोगावती नदीला दूषित पाणी आल्याने नदीपात्रात मासे मृत्यूमुखी पडू लागले आहेत.