बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची अमानुष मारहाण करून हत्या

गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही नेहमी लोकशाहीच्या रक्षणाच्या गप्पा मारणारे राजकीय पक्ष यांवर मौन का बाळगून आहेत ? बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होणार्‍या हत्यांमुळे त्यांना आनंद मिळतो का ?

भाजप कार्यकर्ते कलाचंद कर्मकार यांची अमानुष मारहाण करून हत्या

कुचबिहार (बंगाल) – येथील भाजप कार्यकर्ते ५५ वर्षीय कलाचंद कर्मकार यांची ५ जणांकडून अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. कर्मकार हे येथील भाजपच्या बूथ समितीचे सचिव होते.

या मारहाणीत अन्य दोन कार्यकर्तेही घायाळ झाले आहेत. ही घटना करमापाडा येथे घडली. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे, ‘या हत्येमागे कुठलाही राजकीय संबंध नाही’, तर भाजपने आणि कर्मकार यांच्या कुटुंबियांनी या हत्येमागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे.