वीजदर योग्य न केल्यास आंदोलन करण्याची चेतावणी 

पिंपरी – उद्योगांना सावरण्यासाठी दळणवळण बंदी काळातील वीजदेयक माफ करण्याचे आश्‍वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. त्याची कार्यवाही करण्याऐवजी कोणाचेही वीजदेयक माफ होणार नसल्याचे विधान ऊर्जामंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे वाढीव विद्युत् दराला स्थगिती द्यावी आणि दळणवळण बंदी काळातील विजेचे उपकर आकारू नये या मागणीकडे कानाडोळा केल्याने उद्योगक्षेत्रामध्ये ताण निर्माण झाला आहे. वीजदर सुटसुटीत न केल्यास आंदोलन उभारण्याची चेतावणी संघटनांच्या वतीने देण्यात आली आहे.

दळणवळण बंदी काळात महावितरण आस्थापनाने भरमसाठ वीजदेयक आकारून ते भरण्यासाठी तगादा लावला आहे. स्थिर आकाराविषयीही अनेकांनी आक्षेप घेतले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने दिवाळीनंतर वीजदेयकात दिलासा देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्याऐवजी वीजदेयक वसुलीसाठी वीजजोडणी तोडण्याची धमकी दिली जात असल्याचे माजी नगरसेवक मारुति भापकर यांनी सांगितले.