वणी विभागात एकही शासकीय कापूस खरेदी केंद्र चालू नाही

व्यापार्‍यांकडून होत आहे शेतकर्‍यांची सर्रास लूट

कापूस शेतकर्‍यांच्या या समस्यांकडे राज्यसरकार लक्ष देईल का ?

वणी (यवतमाळ), २० नोव्हेंबर (वार्ता.) – या विभागातील एकही शासकीय कापूस खरेदी केंद्र चालू झाले नाही; त्यामुळे व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची सर्रास लूट होत आहे. आधीच परतीच्या पावसाने हतबल झालेला शेतकरी, त्यात बोंडअळीने ग्रस्त आणि तशातून निघालेल्या कापूस खरेदीसाठी शासकीय केंद्र नाही, अशी दैनावस्था शेतकर्‍यांची झाली आहे.