उत्तरप्रदेश सरकारकडून ‘लव्ह जिहाद’विरोधातील कायद्यासाठी विधी विभागाकडे प्रस्ताव सादर

उत्तरप्रदेश राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात असा कायदा करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारच्या गृहमंत्रालयाने लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याचा प्रस्ताव विधी विभागाकडे पाठवला आहे. राज्यात लव्ह जिहादच्या घटना वाढल्यामुळे कायदा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी लव्ह जिहादवर टिपणी करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले होते, केवळ विवाहासाठी धर्म परिवर्तन अवैध आहे. या टिपणीचा वापर हा कायदा करण्यासाठी होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.