शासनाकडून महाराष्ट्रात उभारण्यात येणारी ‘चक्रीवादळ निवारा केंद्रे’ कागदावरच !

कामाची समयमर्यादा संपूनही निविदा प्रकियेतच काम रखडले ! चक्रीवादळामध्ये होणारी जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी या संवेदनशील प्रश्‍नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, ही अपेक्षा !

सांगली जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

विविध आंदोलने आणि आगामी सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यात ९ ते २३ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश घोषित केला आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाईच्या इशार्‍यानंतर ट्विटरकडून भारतविरोधी ७०९ खाती बंद

सरकारने आता ‘अ‍ॅमेझॉन’ आदींसारख्या विदेशी आस्थापनांचे तोंड दाबून त्यावरून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्याचा प्रयत्न करावा, !

कोरोना योद्ध्यांचे अपघाती विमा प्रस्ताव मनपा प्रशासनाने नाकारले

कठीण काळात जिवाची पर्वा न करता सेवेत प्राण गमावणार्‍या कर्मचार्‍यांच्या वारसांनी काय करावे ? किरकोळ कारणे देऊन कर्मचार्‍यांचे प्रस्ताव नाकारणार्‍या प्रशासनाला कर्मचार्‍यांकडून पैशांची अपेक्षा आहे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

जगात जेथे हिंदू नाहीत, अशा ठिकाणी मुसलमान एकमेकांशी लढून संपत आहेत ! – काँग्रेसी नेते गुलाम नबी आझाद

गुलाम नबी यांना हे सत्य सांगायला इतकी वर्षे का लागली ? असे किती मुसलमान नेते आहेत ज्यांना ही वस्तूस्थिती ठाऊक आहे; मात्र ते सत्य कधीही बोलत नाहीत ? ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता यावर बोलतील का ?

चीनकडून एका बाजूला चर्चा आणि दुसर्‍या बाजूला मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि युद्धसाहित्य तैनात !

चीन विश्‍वासघातकी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने त्याच्या कोणत्याही डावपेचाला बळी न पडता त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी नेहमीच सिद्ध रहावे आणि संधी मिळाल्यास त्याच्यावर आक्रमण करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

माता-पित्यांना न सांभाळणार्‍या वाशिम जिल्हापरिषदेतील कर्मचार्‍यांना ३० टक्के रक्कम माता-पित्यांच्या खात्यांत जमा करावी लागणार !

वाशिम जिल्हा परिषदेने घेतलेला स्तुत्य निर्णय !

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारच्या प्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याला अटक

एका संवेदनशील प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांनी अटक करणार्‍या पोलिसांची (अ)कार्यक्षमता !

प्रदूषणामुळे तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) नंतर आता शिरोळ बंधार्‍यात सहस्रो मासे मृत्यूमुखी

निष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रदूषण मंडळ !

मी कायमच गंगा आणि तिच्या उपनद्या यांवरील जलविद्युत प्रकल्पांच्या विरोधात होते ! – उमा भारती

उमा भारती जेव्हा केंद्रीय मंत्री होत्या तेव्हा त्यांनी वीजनिर्मिती करण्यासाठी धरणे बांधू नयेत, असे प्रतिज्ञापत्र सांगूनही त्यावर कार्यवाही का झाली नाही ? जनतेसाठी, तसेच पर्यावरणासाठी हानीकारक असणारे असे प्रकल्प उभारणार्‍यांवर कठोर कारवाई करा !