भारतविरोधी ट्विटर खात्यांवर कारवाई करावीच लागेल ! – केंद्र सरकारची ट्विटरच्या अधिकार्यांना चेतावणी
ट्विटरने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत पत्रकार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि मंत्री यांच्या खात्यांवर कारवाई करण्यास नकार दिला.
ट्विटरने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत पत्रकार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि मंत्री यांच्या खात्यांवर कारवाई करण्यास नकार दिला.
माघी गणेशोत्सवामध्ये राज्य सरकारने ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे नियमावलीत स्पष्ट केले आहे. सरकारने माघी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना घोषित केल्या आहेत. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.
एखादा खटला ३५ ते ४० वर्षे चालतो आणि त्यानंतर निकाल लागतो, याला न्याय म्हणता येईल का ?
देवगड पंचायत समितीच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये ४ कर्मचार्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. या रकमेमधून त्यांनी मोठे बंगले बांधले असून गावाकडे स्थावर संपत्ती विकत घेतली आहे.
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अक्षय याने अनेक लोकांना गंडा घातला.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील ५ पान टपर्यांवर अन्न – औषध प्रशासन विभागाकडून गुटखा विक्रीच्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. वरील कारवाई प्रकरणी ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पालिकेच्या उद्यानामधील वाळलेल्या गवताला आग लागून १० फेब्रुवारी या दिवशी खेळण्याच्या साहित्याची अनुमाने ३ लाख रुपयांची हानी झाली आहे.
शासकीय रुग्णालये आग प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यास अपयशी का ठरली ? याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. यामध्ये दोषी असणार्यांवर कठोर कारवाई झाल्यासच अशा चुका पुन्हा होणार नाहीत.
काँग्रेसच्या राज्यात रा.स्व. संघाच्या संघचालकांवर प्राणघातक आक्रमण होते; मात्र काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी, बसप, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष किंवा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत !
देशात दिवसाला ४१५ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. ही परिस्थिती कोरोना महामारीपेक्षाही अधिक गंभीर आणि पुढील काळात आणखी चिंताजनक होऊ शकते. परिवहनमंत्री म्हणून या गोष्टीविषयी मी अतिशय संवेदनशील आणि गंभीर आहे.