नवी मुंबई येथे लाच मागणार्‍या लेखाधिकार्‍यावर गुन्हा नोंद !

सेवापुस्तकात वेतन निश्चिती पडताळणी करून त्याची नोंद घेण्यासाठी एका कर्मचार्‍याकडे ४ सहस्र रुपयांची लाच मागणार्‍या लेखाधिकार्‍यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे.

नागपूर येथे ३ लाख रुपयांची लाच घेणार्‍या दोघांना अटक !

८० लाख रुपयांचा कर माफ करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागणार्‍या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सूरज गणवीर आणि रवींद्र बागडे असे त्यांची नावे असून ते येथील महानगरपालिकेच्या आशी नगर झोन येथे कार्यरत आहेत

अवैध धंद्यांवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या विशेष पथकातील पोलिसांनीच वाळू व्यावसायिकाकडे मागितली लाच !

पथकातील पोलीस लाच मागत आहेत, हे ठाऊक असूनही त्यांच्यावर त्याच वेळी कडक कारवाई न झाल्याने ते पळून जाऊ शकले. अशा दायित्वशून्य पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी !

वाडा (जिल्हा पालघर) तालुक्यातील लाचखोर बालविकास प्रकल्प अधिकार्‍याला अटक !

वाडा तालुक्यातील डाहे गावातील अंगणवाडी केंद्रात काम करणार्‍या एका मदतनीस महिलेला कामावर कायमस्वरूपी करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी गोरक्ष खोसे यांनी २१ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

भूमी संमत करण्यासाठी निवृत्त सैनिकाकडून लाच मागणार्‍या महसूल निरीक्षकाला अटक

अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

ठाणे महानगरपालिकेच्या एल्.बी.टी कार्यालयातील लाचखोर लिपिक कह्यात !

अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी !

५ लाख रुपयांची लाच घेतांना ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना अटक !

कोरोनाने रुद्र रूप धारण केलेले असतांना अशा प्रकारे लाचखोरी करणार्‍या आरोग्य अधिकार्‍याला कठोर शिक्षा करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडताच तहसीलदाराने गॅस शेगडीवर जाळले लाखो रुपये !

अशा भ्रष्टाचार्‍यांना फाशीचीच शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्याची आवश्यकता आहे !

निलंबित नगररचना सहसंचालकाकडे ८२ कोटी रुपये सापडले !

उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याकडे अनुमाने ८२ कोटी रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सांगली महापालिकेच्या उद्यान पर्यवेक्षकास ७५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.