३ पोलीस आरोपी फरार
पथकातील पोलीस लाच मागत आहेत, हे ठाऊक असूनही त्यांच्यावर त्याच वेळी कडक कारवाई न झाल्याने ते पळून जाऊ शकले. अशा दायित्वशून्य पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी !

नगर – अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पोलीस उपअधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील पोलिसांनीच वाळू व्यावसायिकांकडे १५ सहस्र रुपयांचा हप्ता मागितला. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने या प्रकरणी ३ पोलिसांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तिघे आरोपी फरार आहेत. शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील हे कर्मचारी असून यातील एक जण मुंढे यांचा वायरसेल ऑपरेटर, तर दोघे विशेष पथकातील आहेत.
१. एप्रिलमध्ये या पथकाने वाळू वाहतूक करणारे एक वाहन पकडले होते. ते वाहन कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी १५ सहस्र रुपये लाचेची मागणी या पोलिसांनी कंत्राटदाराकडे केली.
२. पाथर्डी येथील कंत्राटदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार करून समवेत ‘रेकॉर्डिंग’चे पुरावेही दिले.
३. लाच मागितली जात असल्याची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यातून तक्रारीत तथ्य आढळून आले. मधल्या काळात याची चर्चा झाली. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी यातील काही पोलिसांचे स्थानांतर केल्या.
४. त्यामुळे सावध झाल्याने लाचेचा प्रत्यक्ष सापळा रचता आला नाही, मात्र लाच मागितल्याचा पुरावा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांना मिळाला आहे. त्यानुसार या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद झाल्याचे कळताच तिघेही फरार झाले आहेत.
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !