लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडताच तहसीलदाराने गॅस शेगडीवर जाळले लाखो रुपये !

अशा भ्रष्टाचार्‍यांना फाशीचीच शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्याची आवश्यकता आहे !

नगरकर्नूल (तेलंगाणा) – येथील वेलदंड मंडळाचे तहसीलदार सैदुलु यांनी वेंकटय्या गौड या व्यक्तीला क्रशिंग युनिटसाठी परवाना देण्यासाठी स्थानिक व्यक्तीकडून ५ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते.

जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सापळा रचून त्याच्यापर्यंत पोचले, तेव्हा त्याने ती रक्कम गॅसच्या शेगडीवर जाळली. आम्ही ही रक्कम जप्त केली, तेव्हा त्यांतील ७० टक्के नोटा जळल्या होत्या, अशी माहिती विभागाचे उपायुक्त श्रीकृष्ण गौड यांनी दिली. सैदुल यांना अटक करण्यात आली.