महसूल साहाय्यकाने लाच मागितल्याप्रकरणी त्याला अटक !

शेतकर्‍याकडे थेट लाच मागण्याचे धारिष्ट्य प्रशासकीय अधिकारी करतात. भ्रष्टाचाराची ही बजबजपुरी संपण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

केवळ १.७७ टक्के गुन्हेगारांनाच होते शिक्षा ! १ सहस्र १८१ आरोपींपैकी केवळ २८ जणांना शिक्षा !

भ्रष्टाचाराच्या विरोधातील कारवाईतील दोष सिद्ध होण्याची ही स्थिती अत्यंत विदारक असून अशा प्रकारच्या कारवाईने भ्रष्टाचाराला प्रतिबंध कसा घालणार ? हा प्रश्न निर्माण होत आहे.

पिंपरी (पुणे) येथील रेल्वेच्या सेवानिवृत्त ‘ट्रॅकमन’कडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती !

नोल्ला हे पुणे येथील खडकी रेल्वेस्थानकामधून ऑगस्ट २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी एप्रिल २००८ ते ऑगस्ट २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली.

वडगाव मावळ (पुणे) येथील तलाठ्यास लाच घेतांना अटक !

भूमीच्या ७/१२ उतार्‍यावरील गटाची फोड केल्याची नोंद करण्यासाठी वडगाव मावळ गावाचा तलाठी सखाराम दगडे याने ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. त्या लाचेचा पहिला हप्ता घेतांना दगडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

थेऊर येथील मंडल अधिकार्‍यांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

भूमीच्या सातबारा उतार्‍यावरील कमी केलेले नाव पुन्हा सातबारा उतार्‍यावर लावण्यासाठी थेऊर येथील मंडल अधिकार्‍यांनी १० सहस्र रुपयांची मागणी केली.

छत्रपती संभाजीनगर येथे १० सहस्र रुपयांची लाच घेतांना धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकास अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले धर्मादाय आयुक्त कार्यालय !

लाच घेतांना ४ शासकीय कर्मचार्‍यांना अटक; एका साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश !

वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील (जी.एस्.टी.) मालती कठाळे यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. तक्रारदार व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन सेवा आणि कर क्रमांक घेण्यासाठी अर्ज केला होता. तो क्रमांक देण्यासाठी लाच घेण्यात आली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विषारी अन्नपदार्थ खाऊन ३ श्वानांचा मृत्यू !; अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा अटकेत !…

रस्त्यावर फेकलेले विषारी अन्नपदार्थ खाल्याने पवईत ३ श्वानांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुणे येथे लाच स्वीकारतांना एकाला अटक !

एका ४२ वर्षीय व्यक्तीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी ‘सायबर विभागा’कडे ऑनलाईन तक्रार प्रविष्ट (दाखल) झाली होती. त्याचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्याकडे आहे. 

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून एकाने लाच मागितली !

लाचखोरांवर त्याच वेळी कठोर कारवाई न केल्याने असे गंभीर गुन्हे पुन: पुन्हा घडत आहेत. भ्रष्ट पोलीस यंत्रणा कधी सुधारणार ?