नवी मुंबई – सेवापुस्तकात वेतन निश्चिती पडताळणी करून त्याची नोंद घेण्यासाठी एका कर्मचार्याकडे ४ सहस्र रुपयांची लाच मागणार्या लेखाधिकार्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. रवींद्र दिनकर दातार (वय ५८ वर्षे) असे या लेखाधिकार्याचे नाव आहे. (छोट्या छोट्या कामांसाठीही लाच मागणारे कर्तव्यचुकार आणि भ्रष्ट अधिकारी असणे हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक) तक्रारदाराचे सेवानिवृत्त वडील आणि शिपाई यांच्या सेवापुस्तकाची वेतन निश्चिती पडताळणी करून त्याची नोंद करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. या विभागातील लेखाधिकारी रवींद्र दातार यांनी २७ एप्रिलला त्यासाठी ४ सहस्र रुपयांची लाच मागितली. त्यावर तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.