पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेतांना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून बडगे यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक केली.

लाच मागितल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील तलाठी आणि कोतवाल कह्यात

शेतभूमीच्या फेरफारमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच मागणारे तलाठी बेले आणि कळमनुरी तहसील कार्यालयातील कोतवाल शेख हमीद या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कह्यात घेतले.

जळगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक लाच स्वीकारतांना कह्यात

सरकारी कर्मचार्‍यांमधील लाचखोरीचे वाढते प्रमाण निंदनीय ! असे भ्रष्ट पोलीस जनतेचे रक्षक कि भक्षक ?

उत्तम अन्वेषणापेक्षा राजकीय वापर होण्याच्या कारणाने वारंवार चर्चेत आलेली केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्या संदर्भातील काही तथ्ये !

‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणेेच्या (सीबीआयच्या) कार्यक्षेत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच निवाडा आला. नोव्हेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पिठाने सीबीआयचे कार्यक्षेत्र निश्‍चित केले आहे.

प्राप्तीकर विभागाचे निरीक्षक प्रताप चव्हाण १० लाख रुपयांची लाच घेतांना कह्यात

एका आधुनिक वैद्यांकडून धाड न टाकण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतांना प्राप्तीकर विभागाचे निरीक्षक प्रताप चव्हाण यांना लक्ष्मीपुरी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले. 

राजस्थानच्या लाचलुचपत खात्याच्या उपअधीक्षकालाच लाच घेतांना रंगेहात अटक

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक भैरूलाल मीणा यांनाच ८० सहस्र रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली.

ठाणे महानगरपालिकेतील स्थावर मालमत्ता विभागातील लाचखोर लिपीक कह्यात

तक्रारदार दलालाने मानपाडा येथील ‘दोस्ती इम्पेरियर’ या गृहसंकुलातील सदनिका बारमध्ये काम करणार्‍या मुलीला घेऊन दिली होती. त्याच्यावर नियमानुसार कारवाई न करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतील स्थावर मालमत्ता विभागातील लिपीक हेमंत गायकवाड (वय ३३ वर्षे) यांनी १० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍याला लाच स्वीकारतांना कह्यात घेतले

भ्रष्ट अधिकार्‍यांना कह्यात घेणे, चौकशी करणे आदी जुजबी कारवाई करून न थांबता अशा भ्रष्टाचार्‍यांकडून भ्रष्टाचाराचा सर्व पैसा वसूल करावा !