दौंड (पुणे) शहरातील कचराकुंडीमध्ये मृत अर्भक, मानवी अवयव सापडले !

शहरातील कचराकुंडीमध्ये मृत पुरुष जातीचे अर्भक आणि मानवी शरिराचे अवयव सापडले. या गंभीर घटनेची पोलिसांनी नोंद घेत पंचनामा केला. संबंधित रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे येथील ७९ ठिकाणांचे पाणी दूषित !

पुणे येथे ७९ ठिकाणांचे पाणी नमुने दूषित आढळले असून त्यात ई-कोलाय आणि कॉलीफॉर्म जीवाणू आढळले. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.

विधान परिषदेच्या सभापतींविरोधातील अविश्वास प्रस्ताव विरोधकांकडून मागे !

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात विरोधकांनी प्रविष्ट केलेला अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याविषयीचे पत्र २६ मार्च या दिवशी सभापतींना सादर केले.

महाबळेश्वर (सातारा) भूमी अभिलेख कार्यालयात शेतकर्‍यांवर हेलपाटे मारण्याची वेळ !

अतीतातडीच्या मोजणीसाठी पैसे भरूनही अनेक महिने प्रतीक्षा करण्याची वेळ तालुक्यातील शेतकर्‍यांवर आली आहे. भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारून शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.

बीड जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांचे निलंबन करणार ! – प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री

कोरोना महामारीच्या काळात बीड जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना तात्काळ निलंबित करण्यात येईल. पुढील ३ मासांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल…

हास्यकलाकार कुणाल कामरा याला पोलिसांकडून दुसरे समन्स !

कुणाल कामरा याच्या विरोधात शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबईतील म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकामांची चौकशी आणि कारवाई होणार ! – मंत्री उदय सामंत

मुंबई शहर आणि उपनगरात घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, कोळीवाडा, वाशी नाका, चेंबूर आणि धारावीच्या साईबाबानगर परिसरात म्हाडाच्या जागांवर अनधिकृत बांधकामे आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

पुणे येथे मॅफेड्रोन विक्री करण्याच्या सिद्धतेत असलेल्या धर्मांधाला अटक !

गुन्हेगारीत अग्रेसर असलेले धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत !

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी अधिकाधिक प्रस्ताव सादर करावेत ! – दत्तात्रय भरणे, क्रीडा मंत्री

राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य योजनेत अधिकाधिक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

अमरावती : वाढीव पाणीपुरवठा योजनेस गती देणार ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदूरबाजार, भातकुली, तसेच अमरावती तालुक्यामधील १०५ गावांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यवाहीत काही अडचणींमुळे विलंब झाला आहे. या योजनेच्या उर्वरित कामांना गती देऊन दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे