प्रवाशांचा ऐवज चोरणारा धर्मांध अटकेत !
ठाणे – लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेसमधील प्रवाशांकडील ऐवज चोरी करणार्या सहीमत शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून भ्रमणभाषसंच, आयपॅड आणि दागिने असा ५ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
संपादकीय भूमिका : अशा धर्मांधांना कठोर शिक्षा केल्यासच या प्रकारांना आळा बसेल !
लालबागच्या राजाचे ‘घिबली’ शैलीत रूपांतर नको !
मुंबई – कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) तंत्रज्ञानाद्वारे विविध छायाचित्रे ‘घिबली’ (जपानी उच्चार जिबुरी) शैलीत रूपांतरित करण्यात येत आहेत; पण अशा प्रकारे गणपति आणि इतर देवतांची छायाचित्रे रूपांतरित करू नका, असे आवाहन लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने सामाजिक माध्यमांवर निवेदनाद्वारे केले आहे. ‘ज्यांनी लालबागच्या राजाचे घिबली छायाचित्र रूपांतरित केले असेल, ते त्यांनी सामाजिक माध्यमांवरून काढून टाकावे. गणपतीच्या मूर्तीचे अशा स्वरूपात रूपांतर करणे योग्य नाही’, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे निवेदन
२० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या !
मुंबई – माटुंगा येथील बहुमजली इमारतीच्या छतावरून पडून महाविद्यालयीन विद्यार्थिनी झायना सेठिया (वय २० वर्षे) हिचा मृत्यू झाला. तिने नैराश्यातून इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. ती कुटुंबासह १४ मजली इमारतीमधील आठव्या मजल्यावर रहात होती.
उन्हामुळे ८१ पक्षी घायाळ !
मुंबई – यंदाच्या तीव्र उन्हामुळे मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात ५७ पक्षी घायाळ झाले आहेत. मार्चमधील एकूण घायाळ झालेल्या पक्ष्यांची संख्या ८१ झाली आहे. यात ३७ घारी, २२ कबुतर, १७ कावळे, ४ पोपट आणि १ बदक यांचा समावेश आहे. त्यांच्यावर पशूंशी संबंधित रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. काही पक्ष्यांना उपचार करून अधिवासात सोडण्यात आले.