धारवाड – हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणी एका मुसलमान तरुणाला पोलिसांनी अटक केली. धारवाडच्या चैतन्य कॉलनीतील रहिवासी सलीम ममदापूर याने गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदु धर्माचा अवमान करणारे छायाचित्र प्रसारित केले होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. (हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यानंतर हिंदू पोलिसांत तक्रार करून थांबतात; मात्र मुसलमानांच्या विषयी असे घडल्यास ते सरळ कायदा हातात घेतात आणि आरोपीवर जिवघेणे आक्रमण करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
यापूर्वीही सलीमने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतील असे पोस्ट प्रसारित केले होते. पोलिसांनी त्याला कह्यात घेऊन विद्यागिरी पोलीस ठाण्यात नेले. या वेळी सलीमची आई आणि भाऊ तेथे आले आणि त्यांनी पोलीस आणि हिंदूसमर्थक संघटनेचे कार्यकर्ते यांच्याशी वाद घातला. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.