ठाणे येथील इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील अरेरावी !
ठाणे, २ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यातील आय.सी.एस्.ई. आणि सी.बी.एस्.ई. माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यास बंदी घातली जात आहे, असा आरोप मनसेने केला आहे. यासंदर्भात पालकांनी तक्रार केल्याचे मनसेने सांगितले आहे.
मनसेने याविषयी माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांची भेट घेऊन ‘अशा शाळांवर कारवाई करावी’, अशा आशयाचे निवेदन दिले आहे. शासकीय विभागात मराठीचा वापर करावा, यासाठी पदाधिकार्यांना सक्रीय रहाण्याचे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले होते. या आदेशानंतर ठाणे येथे मनसे आक्रमक झाली आहे.