
पुणे – पुणे येथे मनसेचे गणेश भोकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी इंग्रजी पाट्यांवरून थेट आंदोलनाची चेतावणी दिली आहे. पुणे येथील लक्ष्मी रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय शाळा परिसरात वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्यांमुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठीचा सन्मान झालाच पाहिजे. मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही, असा पवित्रा घेत मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षारक्षकाच्या कानशिलात लगावली आणि त्याला क्षमा मागायला लावली. आज महाराष्ट्रात चहूबाजूंनी भोंदू, फसव्यांचा मराठी लोकांना विळखा पडत आहे. इकडे मुंबईत येऊन आमच्या आस्थापनात मराठी बोलणार नाही, त्याच्या कानफटीतच बसणार. महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत, आस्थापनेत मराठी भाषेचा वापर केला जातो कि नाही ? ते बघण्याचा आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत.
संपादकीय भूमिका :मराठी ही सात्त्विक भाषा असल्यामुळे महाराष्ट्रात रहाणार्या प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा वापर सर्वत्र करणे आवश्यक आहे ! |