वक्फ बोर्डाने बळकावलेल्या हिंदु शेतकरी आणि देवस्थान यांच्या भूमी राज्य सरकार परत करणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई – संसदेत वक्फ सुधारणा विधेयक संमत झाल्यानंतर त्यातील तरतूदी पाहून वक्फ बोर्डाने बेकायदेशीरपणे बळकावलेल्या किंवा अतिक्रमण केलेल्या हिंदु शेतकरी आणि देवस्थान यांच्या भूमी, तसेच काही मुसलमान जनतेच्या भूमी परत करू, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

संपादकीय भूमिका

राज्यातील हिंदूंच्या मंदिरांच्या शेकडो एकर भूमींवरही अतिक्रमण झालेले आहे. त्यांचाही शोध घेऊन त्या अतिक्रमणमुक्त करून मंदिरांना परत देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, असेच हिंदु भाविकांना वाटते !