पुणे – मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात मराठी प्रकाशकांचे योगदान मोलाचे आहे. प्रकाशकांनी बजावलेल्या भूमिकेविषयी ‘विदिशा विचार मंच’ आणि ‘कोहिनूर ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील ६ प्रकाशन संस्थांचा प्रातिनिधिक सन्मान सोहळा ५ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजता (दुसरा मजला, पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ) पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘पुण्यभूषण फाऊंडेशन, पुणे’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतिश देसाई आणि ‘कोहिनूर ग्रुप’चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल उपस्थित रहाणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक, ‘मराठी भाषा अभिजात दर्जा समिती’चे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पाठारे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘विदिशा विचार मंचा’च्या संस्थापिका-संचालिका ममता क्षेमकल्याणी यांनी दिली.