सातारा जिल्ह्यात ‘रेव्ह पार्टी’चे आयोजन न होण्यासाठी पोलिसांनी दक्षता घ्यावी ! – संतोष पाटील, जिल्हाधिकारी

‘नार्को कोऑर्डिनेशन सेंटर’ समितीच्या बैठकीत बोलतांना जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा, २ एप्रिल (वार्ता.) – कोणत्याही पर्यटनस्थळाच्या ‘रेव्ह पार्टी’ (अमली पदार्थांची मेजवानी) होणार नाहीत, याची दक्षता, तसेच तपासणी नाक्यांवर वाहनांची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ‘नार्को कोऑर्डिनेशन सेंटर’ समितीची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘काही औषधांचा उपयोग नशेसाठी केला जातो. अशी औषधे कोणत्या भागांत अधिक विकली जातात, याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाने घ्यावी. अवैधरित्या अफू आणि गांजा यांची शेती होणार नाही, याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी.’’

संपादकीय भूमिका

‘रेव्ह पार्टी’चे आयोजन न होण्याची दक्षता घ्यायला हवी, हे पोलिसांच्या लक्षात का येत नाही ?