पुणे येथे मॅफेड्रोन आणि गांजा विक्री प्रकरणात २ धर्मांधांसह एकाला अटक !

गुन्‍हे शाखेकडून २५ लाखांचे अमली पदार्थ जप्‍त

पुणे – पोलीस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी ‘अमली पदार्थमुक्‍त पुणे’ ही मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्‍तांच्‍या आदेशानुसार शहरातील अमली पदार्थ तस्‍करांविरुद्ध कारवाई करण्‍यात येत आहे. त्‍या अंतर्गत गुन्‍हे शाखेच्‍या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून वेगवेगळ्‍या भागात कारवाई करून २५ लाख ५१ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्‍त केले. त्‍यामध्‍ये मॅफेड्रोन आणि गांजा यांचा समावेश आहे. या प्रकरणी कुमेल महंमद तांबोळी, सैफन उपाख्‍य शफिक इस्‍माइल शेख आणि किरण तुजारे या तिघांना अटक करण्‍यात आली आहे. त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्‍हे नोंद करण्‍यात आले.