विनातिकीट रेल्वेतून प्रवास करणार्या बुरखाधारी महिलेची तिकीट तपासनीसाला धमकी !

मुंबई – सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. यात बुरखा घातलेली एक महिला रेल्वेच्या वातानुकूलित डब्यामध्ये विनातिकीट प्रवास करत असतांनाही तिकीट तपासनीसालाच धमकी देत असल्याचे दिसून येत आहे. जेव्हा तपासनीस या महिलेला रेल्वेतून खाली उतरण्यास सांगतो, तेव्हा ही महिला त्याला म्हणते, ‘मी तुझे तुकडे तुकडे करीन. जा आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडून तिकीट माग !’ या वेळी तिने शिवीगाळही केली.
या महिलेने दुसर्याच्या राखीव जागेवर नियंत्रण मिळवले होते. ज्या प्रवाशाच्या नावावर जागा होती, त्याच्याशीही ही महिला भांडली. या वेळी महिलेने रेल्वे पोलिसांना धक्काबुक्कीही केली. ही घटना कोणत्या दिवशी आणि कुठल्या रेल्वेमध्ये झाली, हे समजू शकले नाही.
संपादकीय भूमिका :
|