नवी देहली – ‘मारुति’ या चारचाकी आस्थापनाने शेणाच्या गॅसपासून चालणारी चारचाकी गाडी बनवली आहे. ‘मोबिलिटी ग्लोबल एक्सपो २०२५’मध्ये ही गाडी प्रदर्शनासाठी ठेवली आहे. ‘फ्रोंक्स’ असे तिचे नाव आहे.
बायोमीथेन गॅसवर ही गाडी चालणार आहे. मागच्या प्रदर्शनामध्ये मारुतीने ‘कंप्रेस्ड बायोमीथेन गॅस’वर चालणारी ‘ब्रेजा’ ही गाडी ठेवली होती. या आस्थापनाने या गाडीची अधिकृत माहिती उघड केलेली नाही. ही गाडी लवकरच बाजारात आणण्याची शक्यता आहे.