महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत भाविकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
प्रयागराज, १ फेब्रुवारी (वार्ता.) – प.पू. अभय चैतन्य फलहारी मौनी महाराज यांनी २९ जानेवारी या दिवशी मृत्यू झालेल्या ३० भाविकांसाठी काही घंट्यांची भूसमाधी घेतली. प.पू. मौनी महाराज यांनी ३१ जानेवारी या दिवशी भूमीत ८ फूट खोल खड्डा खणून सायंकाळी ६.५० ते रात्री ९.५० असे ३ घंटे भूमीत स्वत:ला पुरून घेत उपासना केली. ‘महाकुंभमेळ्यातील घटनेमुळे व्यथित झालो असून मृतांना सद्गती मिळावी आणि पुढील महाकुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी भूसमाधी घेत आहे’, असे प.पू. मौनी महाराज यांनी सांगितले. प.पू. मौनी महाराज यांच्या मंडपात भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी ७ कोटींहून अधिक रुद्रांक्षांची १२ शिवलिंगे सिद्ध केली आहेत.